Friday, April 30, 2010

माझ्या ब्लॉग चा पुनर्जन्म!

बरेच दिवसांनी काही तरी लिहावे असं वाटतंय... माझा मागचा blog post टाकून आता जवळ जवळ दोन वर्ष झाली. हा हा, पण तशी म्हणाल तर हि दोन वर्ष फार पटापट गेली. मी सप्टेंबर २००८ मध्ये अमेरिकेला आलो आणि मग कधी कामात अडकून गेलो हे कळलंच नाही. असं मुळीच नाही कि मी कामात  खूप दिवे पाजळले आहेत पण गेले दोन वर्षात मी फारशी पुस्तक वाचली नाहीत, ना फार सिनेमे पाहिले (इथे अमेरिकेमध्ये नाटकं पाहण्याची अपेक्षा करणं, हे जरा जास्ती होईल, मग ते मराठी असावं आणि वरती प्रायोगिक असावं अशी अपेक्षा करणं तर पाप आहे!) , न हि फार नवीन गाणी ऐकली न काही कला शिकलो आणि ना कोणाला मारला (हे बळच आहे, पण मुद्दा अधोरेखित करण्यासाठी वापरलय सो, भा. पो.), एकंदरीत स्वतःला असा वेळ देण्यात मी अपयशी ठरलो.

आता मी माझं मास्टर्स इन सायन्स संपवत आणलं आहे, सो (मी खूप प्रयत्न केला पण सो साठी मराठी शब्द सापडत नाहीये!!!, मी आता इथपर्यंत आलो आहे SO माझी नेक्स्ट लोगीकॅल स्टेप हि आहे, असं असं झाला आहे SO तसं तसं करायचा Plan आहे. सो, सो, सो!!!) अ'सो'. मुद्दा असा कि सध्या मास्टर्स इन सायन्स संपत आल्याकारणाने थोडा वेळ मिळतो आहे. (आधीही हा वेळ असावाच माझ्याकडे, पण जसा तुम्हाला महिन्या अखेरीस हे इतके पैसे जातात कुठे असा प्रश्न पडतो आणि निरुत्तर करतो, तसेच मी गेले दोन वर्ष फावल्या वेळात केलेल्या गोष्टींची बेरीज शून्य च येतीये किती हि वेळा केली तरी!)  आणि बरीच पुस्तके वाचणे, सिनेमे पाहणे, नवीन नवीन ब्लॉग्स वाचणे, थोडा व्यायाम करणे, गाणी ऐकणे अशा गोष्टी चालू केल्या आहेत. खरतर मी गाणी ऐकत नाहीच मुळी. मी गाणं ऐकतो. मी एकच गाणं ऐकतो. खूप वेळा, इतकं कि मी, माझे रूम मेट्स, माझे इतर मित्र मैत्रिणी आणि माझा अमेरिकन labmate कंटाळले कि साधारण अंदाज येतो, कि मी मग मी पुढचं गाणं ऐकतो. सध्या मी ईश्क़िया मधला 'दिल तो बच्चा है जी' वर अडकलोय. असो.

आता थोडा वेळ मिळतो आहे, तर (So नव्हे तर! तर!! ) थोडा लिहायचा देखील विचार आहे. आज मराठी मध्ये  लिहायचा पहिला प्रयत्न (म्हणजे देव नागरी मध्ये कॉम्पुटर वर लिहायचा, तसे बरेच निबंध आणि काय काय लिहिलं आहे मी मराठी मध्ये), पण फार काही लिहिण्याजोगं डोक्यात येत नाहीये नेमकं, तर म्हणलं  काहीतरी लिहून चालू तर करावं! खरंतर एक दोन चार गोष्टी डोक्यात आहेत (हे म्हणजे अत्र्यांनी 'तो मी नव्हेच' खूप यशस्वी झाल्यावर दिलेल्या मुलाखतीच्या तोर्यात होतंय पण, खरच लिहायचा प्रयत्न करणार आहे ओ!) त्या सुदैवाने पुढच्या काही पोस्ट्स मध्ये दिसतील अशी अपेक्षा.

बाकी सर्व क्षेम कुशल.
- रवी यत्नाळकर.